EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

निवडणुका ईव्हीएम ऐवजी परंपरागत मतपत्रिकांवर घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : निवडणुका ईव्हीएम ऐवजी परंपरागत मतपत्रिकांवर घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. निवडणुकीत विजय झाला तर ईव्हीएम योग्य आणि निवडणुकीत पराभव झाला तर ईव्हीएममध्ये गडबड आहे अशी दुटप्पी भूमिका घेतली जाते. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिली. 

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडी फक्त 46 जागा जिंकू शकली तर इतरांनी 12 जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत मविआला जबर फटका बसला. पराभव झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक्रिया देताना मविआच्या सदस्यांनी ईव्हीएमवरुन जुनेच रडगाणे नव्याने गायला सुरुवात केली. हे रडगाणे सुरू असतानाच ईव्हीएम प्रकरणातील याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका ईव्हीएम ऐवजी परंपरागत मतपत्रिकावर घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मविआची पंचाईत झाली आहे. 

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल

  1. महायुती 230 जागांवर विजय
  2. भाजपा 132 जागांवर विजय
  3. शिवसेना 57 जागांवर विजय
  4. राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
  5. महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
  6. उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
  7. काँग्रेस 16 जागांवर विजय
  8. शरद पवार गट 10 जागांवर विजय
  9. इतर 12 जागांवर विजय

निवडणूक आयोगाची भूमिका

‘भारतीय ईव्हीएम इंटरनेटशी जोडलेले नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएमचा वापर करण्याची पद्धत अतिशय सुरक्षित आहे. यामुळे ईव्हीएम हॅक करणे, त्यात कोणत्याही प्रकारे गडबड करणे शक्य नाही. देशातील सर्व राजकीय पक्ष आणि तज्ज्ञ यांना ईव्हीएम हॅक करुन दाखवा असे आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी कोणालाही ईव्हीएम हॅक करणे जमले नाही. अद्याप कोणालाही भारताचा निवडणूक आयोग वापरत असलेले ईव्हीएम हॅक करणे जमलेले नाही. यामुळे ईव्हीएम हॅक करुन मतांमध्ये फेरफार केल्याचा दावा कोणी केला असेल किंवा करत असेल तर त्यात तथ्य नाही.’

दावे – प्रतिदावे

दावा – जगात मतपत्रिका वापरात आहेत. 
वास्तव – जगात काही ठिकाणीच मतप्रत्रिका वापरतात. 

दावा – अमेरिकेत मतपत्रिका वापरतात. 
वास्तव – अमेरिकेत मतपत्रिका आणि मतदान यंत्र दोन्ही वापरतात. 

दावा – मतपत्रिका वापर पारदर्शी आहे. 
वास्तव – मतपत्रिका वापर खर्चिक आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version