फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला शिक्षा सुनावली असून मलिकला जन्मठेपाच्या शिक्षेसह १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर यासिन मलिकची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने यासिन मलिक प्रकरणात नाक खुपसले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे ट्विट करत यासिन मलिकला पाठिंबा दिला आहे. शाहिद आफ्रिदी यांनी ट्विट केले की, यासिन मलिक हा निर्दोष आहे. यासिनला चुकीच्या प्रकरणात गोवले असून यासिनला शिक्षा देऊन काश्मीर प्रश्न सुटणार नाही, असे संतापजनक ट्वटि शाहिद आफ्रिदीने केले आहे. तसेच, यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावल्यानंतर मलिक समर्थक आक्रमक झाले असून समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1529357436733337600
एनआयएने यासिन मलिकला यापूर्वीच दोषी ठरवले होते. दरम्यान, यासिन मलिकला फाशी देण्याची विनंती एनआयएने न्यायालयाला केली होती. मात्र, पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. यासिन मलिकवर काश्मीरमधील दहशतवादी घटनांना पाकिस्तानी पाठिंब्याने निधी पुरवणे आणि दहशतवाद्यांना विध्वंसाचे सामान पुरविण्याचे आरोप करण्यात आले आहेत.
काश्मीर मधला फुटीरतावादी अतिरेकी.
यासिनकडून १९८४ साली ‘ताला पार्टी’ची स्थापना
मकबूल भटच्या फाशीला विरोध केल्याने यासिनला अटकेत
तुरुंगातून सुटल्यावर ताला पार्टीचे इस्लामिक स्टुडन्ट लीग असे नामांतर
१९८७ – मुस्लिम युनाइटेड फ्रंटच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचा प्रचार.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.