Supermoon and Meteor Shower : अवकाशात नयनरम्य आतषबाजी! ‘सुपरमून’ आणि ‘उल्कावर्षावा’ने होणार नववर्षाचे स्वागत

येत्या 3 जानेवारी रोजी चंद्र आणि सूर्य हे दोन्ही पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार आहेत. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे तो नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसेल. यालाच 'सुपरमून' म्हणतात.
Supermoon and Meteor Shower : अवकाशात नयनरम्य आतषबाजी! ‘सुपरमून’ आणि ‘उल्कावर्षावा’ने होणार नववर्षाचे स्वागत

Supermoon and Meteor Shower : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी निसर्गाने अवकाशात रोषणाईची जय्यत तयारी केली आहे. 2026 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खगोलप्रेमींना एकामागून एक अद्भुत दृश्यांचा आनंद घेता येणार आहे. 'सुपरमून' आणि 'उल्कावर्षावा'ने या वर्षाची सुरुवात होणार असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली आहे.

3 जानेवारीला चंद्राचे विलोभनीय रूप
येत्या 3 जानेवारी रोजी चंद्र आणि सूर्य हे दोन्ही पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार आहेत. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे तो नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसेल, ज्याला आपण 'सुपरमून' म्हणतो. केवळ वर्षाच्या सुरुवातीलाच नाही, तर असाच नजारा पुढे 24 नोव्हेंबर आणि 24 डिसेंबर रोजी देखील अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी सूर्यही पृथ्वीच्या जवळ असेल, मात्र तो दक्षिण गोलार्धात झुकलेला असल्याने तिथे कडक उन्हाळा, तर आपल्याकडे हिवाळा जाणवेल.

उल्कावर्षाव : तारे तुटताना पाहण्याची संधी
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच 3 आणि 4 जानेवारी रोजी अवकाशात उल्कावर्षाव होणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे लघुग्रह किंवा धुमकेतूंचे कण खेचले गेल्याने हा सुंदर नजारा दिसतो. या वर्षात खालील तारखांना तुम्ही उल्कावर्षाव पाहू शकता:
– 3 व 4 जानेवारी
– 23 एप्रिल आणि 5 मे
– 28 जुलै आणि 13 ऑगस्ट
– 21 ऑक्टोबर, 6 व 12 नोव्हेंबर
– 14 व 23 डिसेंबर

हेही वाचा – You Tube AI Trap : सावधान! युट्यूबवर दर 5 पैकी 1 व्हिडीओ बनावट; AI चा वापर करून बनवलेल्या कोट्यवधी व्हिडिओजचा सुळसुळाट

ग्रहणांची मालिका आणि ग्रहांचे दर्शन
नव्या वर्षात एकूण 4 ग्रहणे होणार असून त्यामध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. मात्र, भारतीयांना केवळ 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण पाहता येईल. सध्या आकाशात सूर्यमालेतील सर्वात मोठा 'गुरु' ग्रह रात्रभर दर्शन देत असून, पूर्व क्षितिजावर मृगनक्षत्र आणि मिथुन राशीसोबत तो अतिशय प्रकाशित दिसत आहे.

इतर खगोलीय घडामोडी
शुक्र ग्रह: सर्वात तेजस्वी शुक्र ग्रहाचा अस्त होणार असून, तो 1 फेब्रुवारीपासून 19 ऑक्टोबरपर्यंत पश्चिमेस दिसेल आणि दिवाळीपूर्वी पुन्हा दर्शन देईल.
मंगळ आणि बुध: लालसर रंगाचा मंगळ यावर्षी सूर्याच्या जवळ असल्याने कमी काळ दिसेल, तर बुध ग्रह सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पाहता येईल.
स्पेस स्टेशन: आकाशात फिरत्या चांदणीच्या रूपात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि स्टार लिंक्सचे दर्शनही खगोलप्रेमींना घडणार आहे.

हेही वाचा – Google Lecture Mode: तुमच्या वैयक्तिक नोट्स आता 'ऑडिओ लेक्चर'मध्ये ऐका; गुगलचे नवे फिचर 'लेक्चर मोड' आहे तरी काय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version