टोमॅटोचे दर वाढल्याने सुनिल शेट्टी हैराण

टोमॅटोचे दर वाढल्याने सुनिल शेट्टी हैराण

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : पावसाळा सुरु होताच भाज्यांचे भाव सध्या प्रचंड वाढलेत. अशातच गेल्या काही दिवासांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत.यामुळे देशभरात सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे.

भाज्यांच्या दरवाढीचा केवळ सामान्य जनतेलाच नाही तर कलाकरांनाही फटका बसला आहे. अभिनेता सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या दराबाबत आता वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, ‘माझी बायको घरी फक्त दोन दिवस पुरेल इतकाच भाजीपाला आणते. कारण ताज्या भाज्या खाण्यावरच आम्ही भर देतो. पण, आजकाल टोमॅटोच्या किमती प्रचंड वाढल्यात, त्याचा परिणाम आमच्या घराच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खायला सुरुवात केली आहे.”


पुढे तो म्हणाला ,”बऱ्याचदा लोकांना वाटत की, तो सुपरस्टार आहे त्यामुळे महागाईचा त्याच्यावर काय परिणाम होईल? पण तसं काही नाही. या सगळ्या गोष्टींमधून आम्हीही जातो.कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, “मी एका अॅपवरून भाज्या ऑर्डर करतो. तिथे भाज्यांचे भाव बघितले तर थक्क व्हाल. त्यात भाजीपाला हा मार्ट किंवा भाजी मंडईपेक्षा खुप कमी दरात मिळतो. त्यातही आता महागाई आहे, टोमॅटोचे भाव वाढले असल्याने खाण्याबाबत तडजोड करावी लागते. त्यामुळे आम्ही खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये भाजीपाला लावला आहे.” यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version