Bomb In Peace Rally : भयंकर! तरुणाने स्वतःलाच बॉम्बने उडवले; स्फोटात 8 पोलिसांसह 19 जण ठार, 22 गंभीर जखमी

Bomb In Peace Rally : भयंकर! तरुणाने स्वतःलाच बॉम्बने उडवले; स्फोटात 8 पोलिसांसह 19 जण ठार, 22 गंभीर जखमी

इस्लामाबाद : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या वायव्येकडील स्वात खोऱ्यात एका आत्मघाती हल्लेखोराने दहशतवादविरोधी रॅलीवर हल्ला केल्याचा थरारक क्षण कैद झाला आहे. या रॅलीत शांततेची मागणी करण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात अधिक कठोर कारवाई करण्यासाठी निदर्शक जमले होते. या हल्ल्यात किमान 19 जण ठार झाले. तर दोन डझनांहून अधिक जण जखमी झाले. ही घटना पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील काबल येथे घडली.

फुटेजमध्ये एका पोलीस ठाण्याजवळ मोठा जमाव जमलेला दिसत होता. तर आंदोलक निदर्शनादरम्यान दहशतवादविरोधी घोषणा देत होते. काही क्षणांनंतर, जमावामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला. ज्यामुळे परिसरात घबराट आणि गोंधळ पसरला आणि लोक सुरक्षिततेसाठी सैरावैरा पळू लागले. जिल्हा पोलीस प्रमुख ओमर खान यांच्या माहितीनुसार, ही रॅली स्थानिक रहिवाशांनी आयोजित केली होती. या माध्यमातून त्यांनी शांततेची मागणी केली. तसेच या भागात पुन्हा डोके वर काढणाऱ्या दहशतवादी कारवायांचा निषेध केला. निदर्शक अधिक सुरक्षेची मागणी करत होते. तर या भागात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन प्रशासनाला करत होते. सभास्थळी बोलणाऱ्या वक्त्यांनी पुन्हा एकदा हेच अधोरेखित केले की, सुरक्षा सुनिश्चित करणे आणि दहशतवाद नष्ट करणे ही राज्याची जबाबदारी आहे, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हेही वाचा : Indonesia Ferry Fire: समुद्रात भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या फेरी बोटीला आग; 5 जणांचा मृत्यू, 41 जण बेपत्ता

स्वाट खोऱ्याची राखरांगोडी करणाऱ्या अनेक वर्षांच्या हिंसाचारानंतर येथील रहिवाशांना निर्भयपणे जगायचे आहे, असे सांगत त्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोपही केला. प्रांतीय आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते बिलाल फैझी यांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराने दहशतवादाविरुद्ध आपला विरोध दर्शवण्यासाठी जमलेल्या डझनभर निदर्शकांना लक्ष्य केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सामान्य नागरिक तसेच रॅलीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता, तर या स्फोटात दोन डझनांहून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वतंत्र निवेदनांद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आणि जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. 

गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनीही या बॉम्बस्फोटाचा निषेध केला, शोकाकुल कुटुंबियांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने तात्काळ स्वीकारली नाही. देशभरात वाढलेल्या दहशतवादी हिंसाचाराशी संबंधित असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) वर संशय येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारवर टीटीपी (TTP) अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा वारंवार आरोप केला आहे. मात्र काबूलने हा आरोप फेटाळून लावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version