पीएमपीएल गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा संप

पीएमपीएल गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा संप

पुणेकरांचा प्रवास सुखकर करणारी पीएमपीएमएल काही दिवस पुणेकरांचे हाल करण्याची शक्यता आहे. पुणेकरांना पीएमपीएमएल ठेकेदारांच्या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारलाय. अचानक पुकारलेल्या संपामुळे पीएमपीएमएल बस गाड्यांची संख्या आज कमी असणार आहे. अचानक केलेल्या संपामुळे पुणेकरांचे मात्र हाल होणार आहेत. तीन महिन्यांपासूनचं बिल थकल्यामुळे ४ ठेकेदारांनी संप पुकारलाय.

पुण्यातील मोठी सार्वजनिक वाहतूक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. जवळपास ११०० बसेस यामुळे धावणार नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना हा संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.

रविवारी संध्याकाळी ठेकेदारांनी अचानक संपाचा निर्णय घेतल्यानंतर रस्त्यावर पीएमपीएमएल बस संख्या अचानक कमी झाली.पीएमपीएमएलकडे सध्या २१४२ बसेस आहेत. यापैकी ११०० बसेस या ठेकेदारांच्या असून इतर ९०० बसेस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version