नाशिकमध्ये वाहन चालकांना हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. येत्या २० जानेवारीपासून नाशिकमध्ये वाहन चालकाने हेल्मेट न वापरल्यास ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे, तसेच त्या चालकाचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्दही होऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात येत्या २० जानेवारीपासून हेल्मेट सक्तीबाबत कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हेल्मेट सक्तीसाठी आता आणखी कठोर पावले उचलली जाणार असून २० जानेवारीपासून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या चालकाला ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तर पुन्हा विनाहेल्मेट दुचाकी चालक आढळल्यास त्याला १००० रुपये दंड आकाराला जाणार आहे तसेच तीन महिन्यांसाठी थेट संबंधिताचे वाहन परवानादेखील रद्द करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
नाशिकमध्ये याआधी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’, ‘नो हेल्मेट समुपदेशन’, ‘नो हेल्मेट नो एंट्री’, ‘नो हेल्मेट नो सहकार्य’ या संकल्पना राबवण्यात आल्या. मात्र, पुन्हा नाशिकमध्ये चालक विनाहेल्मेट फिरू लागले आहेत. त्यामुळे विनाहेल्मेट फिरणाऱ्या चालकावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.