भाजप महिला आघाडी अध्यक्ष आणि राज्य महिला आयोग अध्यक्ष या दोन पदाधिकारी महिलांमधील वाद चिघळला आहे.
गुरुवारी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला धारेवर धरून महिला अयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘अनुराधा’ वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडित याना नोटीस पाठवणाऱ्या महिला आयोगाची उर्फीकडे डोळेझाक का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महिला आयोगाचे ‘उर्फीच्या नंगानाचाला समर्थन आहे का ?’ असा सवाल विचारत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती वार करत, या प्रश्नावर स्पष्टीकरण द्यावे असे आवाहनही केले आहे. तसेच रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. तसेच उर्फीने न्युडिटी पसरवल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करून, अटकेची मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघींमध्ये वाद रंगला होता, हाच वाद पुढे जात आता चित्र वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यावर घणाघाती वार केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.