‘राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होणार’ – नाना पटोले

‘राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होणार’ – नाना पटोले

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत असून येत्या १० मार्च रोजी या सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील १३ महनगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. दरम्यान, १० मार्चनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले दिल्लीवारीनंतर परतले आहेत. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे विधान नाना पटोले यांनी केले आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यात सत्तापालट होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनीही १० मार्चचा उल्लेख केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version