एसटी बसने उभ्या कंटेनरला दिली धडक

एसटी बसने उभ्या कंटेनरला दिली धडक

पुण्याहून निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस पुण्याहून बुलडाण्याच्या दिशेनं निघाली होती. मात्र निश्चित स्थळी पोहचण्याआधीच वाटेत घात झाला. वाटेत कंटेनर आडवा आला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर असलेल्या पळसखेड चक्का गावाजवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १० ते १५ जण जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात एव्हढा भीषण होता की, ट्रकमधील चालक हा फसलेला असल्याने त्यांना कटरच्या सहाय्याने तोडून बाहेर काढावे लागले. अपघातामध्ये एस्टी चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस ही वेगाने मेहकरच्या दिशेने जात होती, तर कंटेनर हा मेहकरवरून सिंदखेड राजा कडे जात होता. यावेळी दोघांची समोर समोर धडक झाली. या धडकेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version