आर.आर.आर, जंजीर फेम सुपरस्टार राम चरणचे जगभरात अनेक चाहते आहेत. लवकरच अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला हे लवकरच आई- बाबा होणार आहेत. लग्नाच्या १० वर्षांनंतर ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. या बातमीने राम चरणचे चाहते देखील खुश झाले आहेत. आणि अभिनेत्याचं बाळ जन्माला येण्याची वाट पाहत आहेत. तर आता राम चरणची पत्नी उपासना हिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल विशेष माहिती दिली आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेता राम चरण याची पत्नी उपासना हिने तिच्या प्रसूतीच्या तारखेबद्दलही सांगितले. यावेळी तिने पती राम चरणचं भरपूर कौतुक केलं. तसेच त्याने तिच्या गरोदरपणात त्याने खूप सपोर्ट केल्याचे सांगितले. याशिवाय येत्या जुलै महिन्यात तिची प्रसूती होणार असल्याचे ही तिने सांगितले.
पुढे ती म्हणाली की,”मला प्रॅक्टिकल आई म्हणून काम करायचे आहे. मला माझ्या बाळाची काळजी घेणे आणि माझ्या करिअरमध्ये समतोल साधत मल्टिटास्किंग आई व्हायचं आहे.त्यामुळे आता उपासना आणि राम चरण यांचं बाळ या जगात कधी येणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.