पिंक रॅलीतून तृतीयपंथ्यांनी दिला सामाजिक संदेश

पिंक रॅलीतून तृतीयपंथ्यांनी दिला सामाजिक संदेश

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तृतीयपंथी समाजाची ‘पिंक रॅली’ निघाली. या पिंक रॅली मध्ये तृतीयपंथ्यांनी सामाजिक संदेश दिला.

किन्नर माँ ट्रस्टने मुंबईमध्ये शुक्रवारी १३ जानेवारी रोजी ऑगस्ट क्रांती मैदानापासून ते ग्रँट रोडपर्यंत ‘पिंक रॅलीचं’ आयोजन केलं होतं.
या रॅलीमध्ये तृतीयपंथी समाजाने फलकांच्या माध्यमातून नशाबंदी, स्वच्छता याचं महत्त्व सांगितले.

सर्वसामान्यांना आणि सरकारला मानवी हक्क कळावेत यासाठी सर्व तृतीयपंथी गुलाबी कपडे घालून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
या रॅलीच्या माध्यमातून तृतीयपंथ्यांनी समाजात तृतीयपंथी समुदायाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version