‘सिल्वर ओक आंदोलनाची पूर्वसूचना ४ एप्रिललाच’ – अमित साटम

‘सिल्वर ओक आंदोलनाची पूर्वसूचना ४ एप्रिललाच’ – अमित साटम

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचारी आक्रमक झाले. कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत आंदोलन केले तर शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ८ एप्रिल रोजी पवारांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला. दरम्यान, सिल्वर ओक आंदोलनाची पूर्वसूचना ४ एप्रिललाच देण्यात आली असल्याचे भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले आहे.

‘सिल्वर ओकवरील आंदोलनाची पूर्वसूचना ४ एप्रिल रोजी देण्यात आली होती. पोलिसाना ४ एप्रिल रोजीच आंदोलनाची महिती देण्यात आली होती’, अशी माहिती भाजप आमदार अमित साटम यांनी दिली आहे. त्यामुळे माहिती मिळूनही सिल्वर ओकला सुरक्षा का दिली नाही? असा सवाल अमित साटम यांनी उपस्थित केला आहे.

८ एप्रिल रोजी पवारांच्या निवासस्थानी हल्ला

गुरुवारी ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढत सुनावणी दिली होती. संपकाऱ्यांना आणखी एक संधी देऊन २२ एप्रिल पर्यंत सेवेत रुजू होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिल पर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निर्णयाबाबत गुरुवारी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जल्लोष साजरा केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी ८ एप्रिल (शुक्रवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावर कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत आक्रमक स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान, हे रेकी आंदोलन असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version