आजारी आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

आजारी आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

आजारी असलेले लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्सने मतदानासाठी हजर झाले आहेत. त्याचबरोबर आजारी  दोन दिवसांपूर्वी भाजपच्या कसबा पेठेतील आमदार मुक्ता टिळक यांना आजारी असतानाही राज्यसभेच्या मतदानासाठी गाडीने पुण्याहून मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. आत हॉस्पिटलच्या अॅब्युलन्सने मुक्ता टिळक विधान भवनात दाखल झाल्या. यावरून ही राज्य सभेची निवडणूक किती अटीतटीची आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सने हजर झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी आणि उचारासाठी डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत होती.

तसेच पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक यासुद्धा आाजारी असताना राज्यसभेच्या मतदानासाठी हजर झाल्या आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांना पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांचा ताफा होता. त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. खाली उतरताच त्यांनी जगतापांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले. मुक्ता टिळक या सुद्धा बेडरेस्टवर असताना पक्षाच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मतदानास हजर राहिल्या आहेत. त्यांना येण्यासाठी पक्षाने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.

लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती खालावल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होते.   मधल्या काळात त्यांचा आजार इतका बळावला होता की, ते कोमातही गेले होते. दरम्यान, कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांची एकूण प्रकृती पाहता मुंबईला पाठिविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय राजी नव्हते. त्यांची एकूण अवस्था पाहिली तर जगताप यांच्या आरोग्यावर अधिकचा ताण येईल, अशी कुटुंबीयांची भूमिका होती. मात्र, पक्षादेश असल्याने आपण मतदानाला जाणार असे लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version