कर्नाल, हरियाणा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कर्नाल, हरियाणा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी शिवरायांचा जन्मसोहळा उत्साहात पार पडला. कर्नाल दादूपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळ्याचे अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ॲड. राजसाहेब पाटील, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी गणेशानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र बाहेर मोठ्या प्रमाणात साजरी होणारी शिवजयंती स्फुर्ती देणारी आहे, अशी भावना ॲड. राजसाहेब पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

आयोजक अध्यक्ष राजबीर दाभाडे जी, दादूपूरचे सरपंच, सचिव जगबिर सिंग जी मराठा, आदींनी कर्नाल, पानिपत, कुरुक्षेत्र, रोहतक स्थित रोड मराठा समाजातर्फे व छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्यातर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिने व्यावसायिक दिपक चौधरी, मुंबई, आंध्र प्रदेशचे राष्ट्रीय समरसता मंचचे राष्ट्रीय महासचिव कृष्णकिशोर जी, छत्रपती शिवाजी स्वराज्य मिशन, दिल्लीचे अध्यक्ष ॲड. व्ही. एस. खामकर तसेच शेकडो रोड मराठा बांधव आणि शिवप्रेमी या शिवजयंती उत्सवात सामील झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version