Shilpa Shetty and Raj Kundra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर चौकशीचा फास आवळला, तपासात नवे मुद्दे समोर

सुमारे 60 कोटी रुपयांच्या आरोपांमुळे तपास अधिक गंभीर झाला असून, पुढील चौकशीत महत्त्वाची तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.
Shilpa Shetty and Raj Kundra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर चौकशीचा फास आवळला, तपासात नवे मुद्दे समोर

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजक पती राज कुंद्रा यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुरू असलेल्या कथित फसवणूक प्रकरणात आता भारतीय दंड संहिता कलम 420 जोडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडीमुळे तपास अधिक तीव्र होणार असून, शिल्पा शेट्टी यांचीही सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईओडब्ल्यूकडून करण्यात आलेल्या तपासात सुमारे 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप पुढे आला आहे.

उद्योजक दीपक कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचे गंभीर आरोप नमूद करण्यात आले आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे कलम 420 जोडण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: BMC Election Update: शिंदे गटाचा दावा 125 जागांवर! मुंबईत भाजपा-शिवसेना युतीत जागावाटपाचा पेच

या प्रकरणातील नव्या वळणाबाबत दीपक कोठारी यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी निवेदन जारी करत सांगितले की, उपलब्ध तथ्ये आणि कागदपत्रांच्या आधारे हे कठोर कलम लावण्यात आले आहे. तसेच या कारवाईची माहिती संबंधित न्यायालयाला देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घातल्याचेही समोर आले आहे.

भारतीय दंड संहितेतील कलम 420 हे फसवणूक, चुकीच्या मार्गाने मालमत्ता मिळवणे किंवा मालमत्ता हस्तांतरित करण्याशी संबंधित गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे या कलमाची जोड लागल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे आणि पुढील चौकशी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासाठी हे वादाचे पहिलेच प्रकरण नाही.

यापूर्वीही विविध प्रकरणांमुळे दोघेही चर्चेत राहिले आहेत. विशेषतः पॉर्नोग्राफीशी संबंधित प्रकरणात राज कुंद्रा यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला होता, त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती. तसेच संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांवरूनही दोघांवर याआधी प्रश्न उपस्थित झाले होते. सध्या या नव्या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे नाव पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. तपास पुढे जात असताना आणखी कोणती तथ्ये समोर येतात आणि कायदेशीर प्रक्रिया कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण मनोरंजन आणि व्यावसायिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: IPL 2026 Auction Highlights: पृथ्वी शॉ-सर्फराज खानला एकसारखी बोली, कोणत्या संघांनी विकत घेतलं?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version