कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा सुरू आहे. गुढीपाडव्यापासून या यात्रेला प्रारंभ झाला असून आज १३ एप्रिल हा या यात्रेचा शेवटचा आणि मुख्य दिवस आहे. आजच्या मुख्य दिनी मुंगी घाटातून येणाऱ्या मानाच्या कावडीधारकांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार घाटातून वर येऊन मंदिरात जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.
अखंड महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरची यात्रा सुरू आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे कावड काट्या. या कावडीचे बारामती तालुक्यातून झारगडवाडी, डोर्लेवाडी गावातून भक्तिमय वातावरणात रात्री शिंगणापुरकडे पायी प्रस्थान झाले आहे. दोन वर्षातून यावर्षी यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला आहे. आज या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगी घाट सोहळा होणार असून हा मुंगी घाट सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करीत असतात. या सर्व कावडी मुंगी घाटाची अवघड चढण पार करून शिंगणापूर मध्ये दाखल होतात त्यानंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाला कऱ्हा नदीच्या पवित्र जलाची धार घालण्याची परंपरा आहे. कोरोनाच्या संकटामुळे २ वर्षांनंतर यात्रा भरल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.