छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्र्याची शेड कोसळली

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्र्याची शेड कोसळली

गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना, प्रेक्षकांमध्ये पत्र्याची शेड कोसळल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे घडला. काही प्रेक्षक पत्र्याच्या शेडवर बसून गौतमी पाटील यांचा कार्यक्रम बघत होते. त्या वेळी प्रेक्षकांच्या वजनाने शेड कोसळली आणि धावपळ उडाली. या दुर्घटनेत काही प्रेक्षकांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे.

महालगाव येथे गौतमी पाटील एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांनी कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे प्रेक्षक मिळेल त्या ठिकाणी बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते.‌ काही जण स्टेजसमोरच्या मोकळ्या जागेत, काही जण आजूबाजूच्या दुकानांसमोर, तर कुणी पत्र्याच्या शेडवर बसून कार्यक्रम पाहत होते. कार्यक्रम ऐन रंगात आला असताना, प्रेक्षक बसलेल्या एका दुकानावरील पत्र्याचे छत अचानक कोसळले आणि एकच धांदल उडाली.

यापूर्वी सांगलीतील बेडग येथे सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळीही लोकांनी तुफान गर्दी केली होती. तर काही जण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहत होते. यावेळी शाळेच्या कौलांचंही नुकसान झालं, तसंच आळेच्या जाळीच्या कंपाऊंडचेही नुकसान झालेल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version