Share Market Crash: आखाती युद्धाचा मोठा फटका! सेंसेक्स-निफ्टी आपटला; अवघ्या काही सेकंदातच गुंतवणूकदारांचे 1.14 लाख कोटी बुडाले

इराणने दोन तेलवाहू टँकरवर हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) दरांनी पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे.
Share Market Crash:  आखाती युद्धाचा मोठा फटका! सेंसेक्स-निफ्टी आपटला; अवघ्या काही सेकंदातच गुंतवणूकदारांचे  1.14 लाख कोटी बुडाले

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने दोन तेलवाहू टँकरवर हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) दरांनी पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेल्यानंतर आशियाई बाजारांसह भारतीय बाजारावरही मोठा दबाव निर्माण झाला. आज शेअर मार्केटमध्ये व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची घसरण नोंदवली, तर निफ्टी 24,050 च्या पातळीपर्यंत खाली आला. बाजारातील या मोठ्या घसरणीचा फटका गुंतवणूकदारांनाही बसला. अवघ्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.14 लाख कोटी रुपये इतकी घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जागतिक घडामोडींचा फटका भारतीय भांडवली बाजारालाही बसला असून, बाजार उघडताच गुंतवणूकदारांची मोठी संपत्ती गमावली गेली. 13 जुलै रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य (मार्केट कॅप) 481.59 लाख कोटी रुपये होते. मात्र, मंगळवारी सकाळी ते घसरून 480.45 लाख कोटी रुपयांवर आले. परिणामी, अवघ्या एका सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.14 लाख कोटी रुपयांची घट झाली.

सकाळी सव्वा 9 च्या सुमारास सेन्सेक्स 397.08 अंकांनी घसरून 77,219.32 वर व्यवहार करत होता. त्याचवेळी निफ्टीही 99.80 अंकांच्या घसरणीसह 24,111.20 या पातळीवर होता. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 77,063.41, तर निफ्टीने 24,050.55 या दिवसातील नीचांकी पातळीची नोंद केली.

ऑटो, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर सर्वाधिक दबाव

बाजारातील घसरणीचा सर्वाधिक परिणाम ऑटोमोबाईल, खासगी बँका आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागांवर झाला. या क्षेत्रांतील बहुतांश शेअर्समध्ये 0.5 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. मात्र, आयटी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या समभागांनी तुलनेने चांगली कामगिरी करत बाजाराला काहीसा आधार दिला.

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 8 समभाग वाढीसह व्यवहार करत होते. टाटा स्टील, इन्फोसिस आणि टीसीएस हे प्रमुख वाढ नोंदवणाऱ्या कंपन्यांमध्ये होते. दुसरीकडे एचसीएल टेक, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांवर विक्रीचा दबाव अधिक दिसून आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version