शरद पवारांना कोरोनाची लागण

शरद पवारांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असून त्यांना  कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच सध्या प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शरद पवारांनी ट्विट केले की, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत असून काळजी करण्याचे कारण नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्या.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version