Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी ‘तेजी’; सेन्सेक्स 850 अंकांनी उसळला, निफ्टीने गाठली 23 हजारांची पातळी

दरम्यान, मंगळवार 24 मार्च 2026 च्या व्यवहारातही बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. काल सेन्सेक्स 1,372.06 अंकांनी म्हणजेच 1.89 टक्क्यांनी वाढत 74,068.45 या स्तरावर बंद झाला होता.
Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी ‘तेजी’; सेन्सेक्स 850 अंकांनी उसळला, निफ्टीने गाठली 23 हजारांची पातळी

मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहार दिवशी म्हणजेच बुधवार, 25 मार्च 2026 रोजी उत्साहवर्धक वातावरण दिसून आले. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 यांनी सकारात्मक सुरुवात करत बाजार हिरव्या निशाणावर उघडला. गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर बाजारात सुरुवातीपासूनच तेजीचा कल पाहायला मिळाला.

30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 583.56 अंकांनी म्हणजेच 0.79 टक्क्यांनी वाढत 74,652.01 या पातळीवर उघडला. तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांकानेही मजबूत सुरुवात करत 152 अंकांची म्हणजेच 0.66 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि 23,064.40 या पातळीवर व्यवहार सुरू केले. सकाळी सुमारे नऊ वाजून 22 मिनिटांपर्यंत सेन्सेक्स तब्बल 858 अंकांच्या वाढीसह 74,927 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 50 जवळपास 277 अंकांनी उडी घेत 23,190 या स्तरावर पोहोचला होता.

बीएसईच्या समभागांमध्ये एटरनल, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स आणि ट्रेंट हे समभाग सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्यांमध्ये होते. दुसरीकडे टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक या समभागांमध्ये किंचित घसरण दिसून आली आणि ते टॉप लूझर्स ठरले.

हेही वाचा: Maharashtra Land Laws: महाराष्ट्रात जमीन व्यवहारांमध्ये मोठी क्रांती! 40 पट नजराणा रद्द, प्रकल्पांना मुदतवाढ; नवीन नियम जाहीर

दरम्यान, मंगळवार 24 मार्च 2026 च्या व्यवहारातही बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. काल सेन्सेक्स 1,372.06 अंकांनी म्हणजेच 1.89 टक्क्यांनी वाढत 74,068.45 या स्तरावर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी 50 निर्देशांक 399.75 अंकांनी म्हणजेच 1.78 टक्क्यांनी वाढून 22,912.40 या पातळीवर स्थिरावला होता.

मंगळवारच्या व्यवहारात एलअँडटी, इंडिगो, एटरनल, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स या समभागांनी आघाडी घेतली होती, तर पावरग्रिड, सन फार्मा आणि एसबीआय या समभागांमध्ये घसरण दिसून आली.

याशिवाय निफ्टी 100, निफ्टी ऑटो, निफ्टी स्मॉलकॅप 100, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी बँक, निफ्टी आयटी आणि निफ्टी मिडकॅप 100 या विविध क्षेत्रांतील निर्देशांकांमध्येही तेजीचा कल कायम होता. मंगळवारच्या व्यवहारात बीएसईच्या बास्केटमधील 30 पैकी तब्बल 27 समभाग वाढीसह बंद झाले, तर केवळ 3 समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या! 

हेही वाचा: Alcohol Price Increase: तळीरामांच्या खिशाला ताण येणार? उन्हाळ्याच्या तोंडावर बिअर आणि विदेशी मद्याच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढीचे संकेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version