शिवसेना खासदार संजय राऊत उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आशीर्वाद यात्रेवर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली.
संजय राऊत उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर राऊत आज शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यास पवारांच्या सिल्व्हर ओक येथे पोहचले.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, उद्या मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यासाठी मी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांसोबत चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेचा सहावा उमेदवार राज्यसभेत विजयी होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला असल्याचे राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, शिवसेनेचे दोन उमेदवार उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहे. मी आणि कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी मी आज शरद पवरांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेतृत्व आहे. सरकारचा आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.