समीर वानखेडेंची न्यायालयात धाव

समीर वानखेडेंची न्यायालयात धाव

  एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली आहे.

 न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत, ‘प्रभाकर साईलने कोर्टात तक्रार का केली नाही? तसेच प्रभाकर साईलने २२ दिवसांनी हा आरोप का केला?’ असा सवाल वानखेडेंनी विचारला आहे.

  माझ्यावर राजकीय पक्षाचा दबाव असून माझ्यावर वारंवार वैयक्तिक हल्ले करण्यात येत आहेत. माझ्यावर चुकीचे आरोप करून मला धमक्या दिल्या जात आहेत. ज्या महिलेसोबत माझा घटस्फोट झाला आहे तिच्यासोबत फोटो कुणाच्या परवानगीने व्हायरल करण्यात आले? इतक्या खालच्या पातळीचे आरोप माझ्यावर होत असल्याचे, वानखेडे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version