Arbaaz Sheikh : ‘सैराट’फेम अरबाज शेख यांच्या वडिलांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; व्हिडीओनंतर उपचारासाठी मिळालेली मदत

Arbaaz Sheikh : ‘सैराट’फेम अरबाज शेख यांच्या वडिलांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; व्हिडीओनंतर उपचारासाठी मिळालेली मदत

सोलापूर : 'सैराट'फेम सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरबाजचे वडील अस्लम शेख यांचं उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झालं आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर मेंदूशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. अरबाज शेख याने काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासंदर्भात रडत रडत व्हिडिओ केला होता. सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलच्या मनमानी कारभारावर त्याने आरोप केले होते. या हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध खरेदीसाठी सक्ती करण्यात येत असल्याचं अरबाजने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर एफडीएने कारवाई करत नोबेल हॉस्पिटलमधील संबंधित मेडिकल दुकानांची तपासणी करून या दुकानांवर कारवाई केली होती.

हेही वाचा : Satara: धमकावलं, कॉलर पकडली, नोकरीवरूनही काढलं; साताऱ्यात डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं? एका चिठ्ठीने केला गौप्यस्फोट

दरम्यान, त्यांच्या वडिलांच्या उपचाराची बातमी समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला होता. उदय सामंत यांनी अरबाजला एक लाख रुपयेदेखील दिले होते. सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने पुढाकार घेत डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पूर्ण मदत केली. तसेच अरबाजने व्हिडीओमध्ये वडिलांना वाचवण्यासाठी भावनिक आवाहन केले होते. मात्र आता त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले असून त्याच्या वडिलांची प्राणज्योत मालवली असल्याचे समजते.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version