रशियाकडून युक्रेनच्या ४ शहरात युद्धविरामाची घोषणा

रशियाकडून युक्रेनच्या ४ शहरात युद्धविरामाची घोषणा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धाचा तीढा कायम असून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. रशियाने केलेल्या गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठे नुकसान झाले असून जीवितहानी झाली आहे. दरम्यान, रशियाकडून युक्रेनच्या चार शहरांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमधील कीव, खारकीव्ह, सुमी, मारियुपोल या शहरांमध्ये रशियाकडून तात्पुरता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने युक्रेनच्या चार शहरांमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अद्याप युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तर अशातच, रशियाकडून युद्ध विरामाची घोषणा झाल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून निघणे सोपे झाले आहे.

पंतप्रधान मोदींचा युद्धप्रकरणी संवाद

शनिवारीसुद्धा रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा रशियाकडून युक्रेनच्या चार शहरांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धप्रकरणी रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. फोनवरून पंतप्रधान मोदी पुतीन आणि जेलेन्स्की यांच्याशी संवाद साधणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version