Rupee Vs Dollar: रुपयाचा कमबॅक! डॉलरच्या तुलनेत रूपया 89 च्या पातळीवर पोहोचला

सातत्याने वाढणारा दबाव रोखण्यासाठी RBI ने डॉलर विक्री करत हस्तक्षेप केला. SBI ने रुपयाच्या दीर्घकालीन भविष्यासाठी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.
Rupee Vs Dollar: रुपयाचा कमबॅक! डॉलरच्या तुलनेत रूपया 89 च्या पातळीवर पोहोचला

मुंबई: अमेरिकन डॉलरच्या (US Dollar) तुलनेत भारतीय रुपयाने (Rupee) शुक्रवारी पुन्हा एकदा मजबुती दाखवली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 90 प्रति डॉलर पातळीचा टप्पा ओलांडत थेट 89.96 प्रति डॉलरपर्यंत मजबूत झाला. रुपयाची सुरुवात 90.1325 प्रति डॉलर पातळीपर्यंत झाली होती, जी मागील बंद भाव 90.20 प्रति डॉलर तुलनेत सुमारे 0.1 टक्के मजबूत होती.
 
या आठवड्याच्या सुरुवातीला रुपया विक्रमी घसरणीला सामोरा गेला होता. काही काळासाठी रुपया डॉलरच्या तुलनेत 91 पातळीपर्यंत घसरला होता. मात्र त्यानंतर रुपयात हळूहळू सुधारणा दिसून आली असून, ही सुधारणा तात्पुरती का असेना पण महत्त्वाची मानली जात आहे.
 
या वाढीमगे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India, RBI) चा हस्तक्षेप महत्त्वाचा ठरल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. रुपयावर सातत्याने दबाव वाढल्यानंतर RBI ने बाजारात डॉलर विक्री (Dollar Selling) करत हस्तक्षेप केला. यामुळे एकतर्फी घसरणीचा ट्रेंड (One-way Depreciation) खंडित झाला आणि डॉलरच्या बाजूने घेतलेल्या नकारात्मक पोझिशन्स (Bearish Positions) unwind होऊ लागल्या.

हेही वाचा: Maharashtra Weather : राज्यात धुक्याची चादर! IMD चा मोठा इशारा; पुढील 48 तास…

 
बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, RBI चा हा हस्तक्षेप ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांतील धोरणासारखाच आहे. त्या काळातही रुपयातील सततची कमजोरी रोखण्यासाठी RBI ने स्पॉट मार्केट (Spot Market) आणि नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड मार्केट (NDF Market) मध्ये मोठ्या प्रमाणात डॉलर विक्री केली होती.
 
दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) ने रुपयाच्या दीर्घकालीन भविष्यासंदर्भात सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. SBI च्या ताज्या अहवालानुसार, पुढील आर्थिक वर्षाच्या (Financial Year) उत्तरार्धात रुपयात चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. ही सुधारणा ऑक्टोबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीत दिसून येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
SBI च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, रुपयातील सध्याची कमजोरी ही संरचनात्मक (Structural) नसून ती चक्रीय (Cyclical) स्वरूपाची आहे. इतिहास पाहता रुपयाने याआधीही अनेक वेळा घसरण आणि मजबुतीचे टप्पे अनुभवले आहेत. त्यामुळे सध्याच्या घसरणीच्या टप्प्यातून रुपया पुढील आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात बाहेर पडेल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: मुंबईत पवारांची ठाकरे बंधूंना साथ? राज-उद्धवकडे किती जागांची मागणी?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version