पुण्यात रिक्षा प्रवासाच्या दरात ३ रुपयांनी वाढ

पुण्यात रिक्षा प्रवासाच्या दरात ३ रुपयांनी वाढ

  वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. इंधनावरील किंमती शंभरीच्या घरात पोहचल्यानंतर आता पुण्यातील रिक्षाप्रवासही महागला आहे. पुणे जिल्ह्यात रिक्षा प्रवासाच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे.

  पुणे जिल्ह्यात रिक्षा प्रवासाच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली असून पहिल्या दिड किलोमीटरसाठी १८ रुपये ऐवजी आता २१ रुपये भाडे होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत पंचवीस टक्के अधिक भाडे रिक्षासाठी मोजावे लागणार आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागामधे याच कालावधीत रिक्षासाठी चाळीस टक्के अधिकचे भाडे मोजावे लागणार आहे. पुण्यात रिक्षा प्रवासाच्या ३ रुपयांनी वाढ झाल्यामुळे प्रवासांना रिक्षाने प्रवास करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version