राज्यसेवा आयोगाच्या उमेदवारांना दिलासा

राज्यसेवा आयोगाच्या उमेदवारांना दिलासा

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांवर राज्यमंत्री मंडळाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेच्या उमेदवारांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
पुण्यामध्ये एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी साष्टांग नमस्कार करत पुण्यातील अलका चौकमध्ये मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी आंदोलन केले. बदललेल्या अभ्यासक्रमासाठी योग्य वेळ देण्यात यावा, नवीन अभ्यासक्रम २०२५ वर्षांपासून लागू करावा आणि पूर्वीच्या अभ्यासक्रमानुसार सध्याच्या परीक्षा व्हाव्यात, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.
यावर मंगळवारी, ३१ जानेवारी २०२३ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू होणार’, असा निर्णय घेण्यात आला आहे. ‘राज्य सरकार राज्यसेवा आयोगाला विनंती करणार असून लवकरच या निर्णयाबाबतीत अधिकृत घोषणा होईल’, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version