रविकांत तुपकरांचे आंदोलन तुर्तास स्थगित

रविकांत तुपकरांचे आंदोलन तुर्तास स्थगित

  बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. तरीही शासन प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाची दखल घेण्यात येत नव्हती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निरोप घेऊन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला भेट दिली. येत्या बुधवारी अजित पवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह काही लोकांना घेऊन या ठिकाणी सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भात चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे रविकांत तुपकर  यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित  केले आहे.

  सोयाबीन, कापूस उत्पादन हमीभावासह विदेशातून आयात करण्यात येत असलेली सोयाबीन पेड बंद करण्यात यावी या मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. तसेच या आंदोलनादरम्यान रास्ता रोको, दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली.

  बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या आंदोलनात मध्यस्थी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित करत शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version