Ramayana Movie 2026: ‘रामायण असं बनवा की पुन्हा कोणी बनवू शकणार नाही’ ; जुन्या ‘रामायण’ मालिकेतील सीतेचा रामायण चित्रपटाला सूचक टोला

 बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरलेला ‘रामायण’ हा भव्य चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Ramayana Movie 2026: ‘रामायण असं बनवा की पुन्हा कोणी बनवू शकणार नाही’ ; जुन्या ‘रामायण’ मालिकेतील सीतेचा रामायण चित्रपटाला सूचक टोला

Ramayana Movie 2026: बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरलेला ‘रामायण’ हा भव्य चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका रणबीर कपूर साकारत असून, मोठ्या बजेटमुळे आणि स्टारकास्टमुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, याच चित्रपटावर आता जुन्या ‘रामायण’ मालिकेतील सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलीया यांनी सूचक टीका केली आहे.

सोशल मीडियावर सध्या दीपिका यांची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘रामायण’सारखी कलाकृती अशी असावी की, कितीही मोठा खर्च केला तरी त्याची सर येऊ नये, असा आशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन चित्रपट आणि जुन्या मालिकेची तुलना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हेही वाचा: मराठी अभिनेत्रीला कॅब बुक करणं पडलं महागात; ड्रायव्हरने थेट नंबर केला लीक ,अनोळखी व्यक्तीकडून सतत कॉल्स…

1880 च्या दशकात प्रसारित झालेली रामायण ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्या काळात कमी साधनसामग्री असूनही या मालिकेने प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडले. त्यामध्ये प्रभू रामाची भूमिका अरुण गोवली यांनी साकारली होती, तर सीतेच्या भूमिकेमुळे दीपिका चिखलिया यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या चित्रपटासाठी तब्बल 4000 कोटींचा खर्च केल्याची चर्चा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः VFXच्या मदतीने हा सिनेमा भव्यदिव्य स्वरूपात साकारला जाणार आहे. चित्रपटात सीतेची भूमिका साई पल्लवी साकारणार असून, रावणाच्या भूमिकेत यश दिसणार आहे.

हेही वाचा:Samay Raina Controversy: समय रैनाने उडवली ‘शक्तिमान’ची खिल्ली; मुकेश खन्नांचा संताप शिगेला, रोस्टिंगला उत्तर देत म्हणाले, ‘कुत्र्याची…’

विशेष म्हणजे, या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका यांनी त्याचं कौतुकही केलं होतं. त्यामुळे त्यांच्या ताज्या विधानामुळे नेमकं त्यांनी टीका केली की फक्त तुलना मांडली, यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकीकडे प्रेक्षक नव्या ‘रामायण’कडून भव्य अनुभवाची अपेक्षा करत आहेत, तर दुसरीकडे जुन्या मालिकेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version