चहाच्या व्हिडिओवर राणांच्या वकिलाचा खुलासा

चहाच्या व्हिडिओवर राणांच्या वकिलाचा खुलासा

खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित धक्कादायक आरोप केले आहे. कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असून त्यांचा अमानुष छळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. अशातच पोलीस आयुक्तांनी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ ट्विट केला आहे. दरम्यान, चहाच्या व्हिडिओवर राणांच्या वकिलांनी खुलासा आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी ट्विटरवर प्रसारित केलेला राणा दाम्पत्यांचा चहाचा व्हिडिओ खार पोलीस ठाण्यातला आहे. तर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात त्यांचा छळ झाला असल्याचा आरोप राणांच्या वकिलांनी केला आहे.

पोलीस आयुक्तांनी ट्विट केला व्हिडिओ

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी व्हिडिओद्वारे नवनीत राणा यांचा पोलीस कोठडीत छळ केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. या व्हिडिओमध्ये राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहेत. त्यामुळे आता कोण खरं आणि कोण खोटं, असा सवाल उपस्थित होत आहे.

काय आहेत नवनीत राणांचे आरोप?

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांना कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला आहे. तसेच माझा अमानुषपणे छळ केला जात आहे, तर मी अनुसूचित जातीची असल्यामुळे माझा छळ होत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला आहे.

तसेच त्यांनी लिहिले की, ‘मी पिण्यासाठी पाणी मागितले मात्र, मला रात्रभर पाणी दिले नाही. तसेच आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची असल्यामुळे मला पाणी पिण्याचा मुलभूत अधिकार नाकारण्यात आला.’ असेही त्यांनी पत्रात नमूद केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version