शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ 30 जानेवारीला प्रेक्षक भेटीला येणार आहे.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील सहावे पुष्प असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथमदर्शन यावेळी उपस्थितांना अनुभवता आले. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.
शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.