मुंबई, ७ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच काही ना काही करून स्वतःला प्रकाशझोतात आणायचा प्रयत्न करत असते. काही महिन्यांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले . त्यांनतर तिच्या वैवाहिक जीवनात अडीअडचणी निर्माण झाल्या.अशातच राखीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप व्हायरल होत आहे.
राखी नेहमीच तिच्या बेधडक वागण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. यामुळे ती बऱ्याचदा ट्रोल देखील होते. अलीकडेच एका व्हिडिओत राखीने तिला तिचा शेहजादा भेटला असल्याचं सांगितलं. दुबईत तिला हा शेहझाद भेटला. तसेच त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत राखी एका व्यक्तीचा हात पकडून चालताना दिसत आहे. राखी म्हणते, “या हबीबी… राखी सावंतला मिळाला तिचा हबीबी. हे अरबीजी आहेत. दुबईत आले आणि मला मिळाला माझा शहजादा.” यानंतर राखी त्यांना या व्हिडीओत अरबी भाषेत तिचं कौतुक देखील करायला सांगते. हा विडिओ पाहताच नेटकरी वेडे झालेत तर या व्हिडिओ खाली भन्नाट कंमेंट्स यायला सुरुवात झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.