चेन्नई : तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी ३५ वर्षे तटरक्षक दलाच्या माध्यमातून देशसेवा केली. राकेश पाल यांच्या निधनाची माहिती मिळताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन दुःख व्यक्त केले.
छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर राकेश पाल यांना चेन्नईच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते देशाच्या तटरक्षक दलाचे पंचविसावे महासंचालक होते.
राकेश पाल यांना अतिविशिष्ट सेवा पदक, राष्ट्रपती तटरक्षक पदक आणि तटरक्षक पदक या तीन पदकांनी गौरविण्यात आले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आणि जुलै २०२३ मध्ये त्यांची तटरक्षक दलाच्या महासंचालक या पदावर नियुक्ती झाली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.