‘राज ठाकरेंच्या सभेला परवानगी’ – सूत्र

‘राज ठाकरेंच्या सभेला परवानगी’ – सूत्र

१ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेची सभा पार पडणार आहे. मात्र, सभेला पोलिसांची परवानगी मिळाली नसल्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचं काय होणार? असा सवाल उपस्थित होत होता. अखेर राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देण्यात आली असून अटी-शर्तींसह सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच दुपारी १२ वाजेपर्यंत सभेला परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. अटी-शर्तींसह सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे.

राज ठाकरे यांच्यासभेसाठी ‘या’ आहेत अटी-शर्थी

ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.

लहान मुलं, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी.

इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळे धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.

व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.

वाहन पार्किंगचे नियम पाळावे.

सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.

सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत.

सामाजिक सलोखा बिघडेल, असे वर्तन करू नये.

 कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version