वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून अशातच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा तालुक्याच्या पवनूर येथे सतत सुरु असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला आहे. सोबतच येथील नाल्याला पूर आला आहे. नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणी कामठी या गावात पाणी शिरले आहे तर येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पवनूर येथील नागरिकांची तेथीलच असलेल्या मंदिरात व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.मुसळधार पावसामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. ४० ते ५० घरांना धोका निर्माण झाला आहे.
मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतीतीळ पीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाल्यांना आलेल्या पुरामुळे हिंगणघाट येनोरा मार्ग आणि समुद्रपूर वर्धा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर सेलू तालुक्याच्या सालई पेवठ येथे शेतशिवारातून पुराच्या प्रवाहात संतोष उत्तम आडे हा व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. अद्याप या व्यक्तीचा शोध लागला नसून सकाळी पुन्हा प्रशासनाकडून शोध मोहीम राबवली जाणारा आहे.
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे, अनेक शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र पहिला मिळाले आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे, पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी घरे पाण्याखाली गेली आहेत तर काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.