टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विन कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाल्यापासून परिक्षेत गैरप्रकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी आणखी दोन व्यक्तींना अटक केली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा प्रमुख अश्विन कुमारला पोलिसांनी बंगळूरमधून अटक केली आहे. तर सुखदेव डेरे यांना त्यांच्या मूळ गावातून अटक करण्यात आली आहे.
२०१७ ते २०२० या कालावधीमध्ये जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यावेळी २०१७मध्ये सुखदेव डेरे हे शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. यावेळी या सर्वांनी मिळून २०१८मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेमध्ये अपात्र उमेदवारांना पात्र ठरवले. त्यामुळे आता टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विन कुमार यांना अटक करण्यात आली असून एकच खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.