केरळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

केरळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिरुअनंतपुरम आणि कासरगोड दरम्यानच्या केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला.कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम -कासरगोड वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली. त्यांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी तसेच ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.

वंदे भारतच्या प्रवासादरम्यान एका विद्यार्थ्याची हिंदी ऐकून पंतप्रधानही थक्क झाले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्याला इंग्रजीत विचारले – तुम्ही कुठून आहात? विद्यार्थ्याने पंतप्रधानांच्या प्रश्नाचे हिंदीत उत्तर दिले – मी त्रिवेंद्रचा आहे. पीएम म्हणाले, “बरं, तू खूप छान हिंदी बोलतोस. तू कविताही लिहितोस. तू विज्ञानाचाही अभ्यास करतोस… तू खूप प्रतिभावान आहेस.”

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वच्छतेबाबत आपले मत व्यक्त केले. ज्यानंतर मोदींनी आता रेल्वे प्लॅटफॉर्म स्वच्छ होते का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी तो विद्यार्थी हो म्हणाला. तसेच ट्रेनमध्ये प्रवास करताना खूप छान वाटत आहे. उडण्याचा अनुभव येत आहे, असे देखील विद्यार्थ्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर असून ते येथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. तसेच मोदी हे या ठिकाणी रोज शो देखील करत आहेत. त्यांना पाहण्यासाठी केरळच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version