पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज १४ जूनला देहूत येणार आहेत . त्यांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होईल. यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होते , त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहेत. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.
कसा असेल पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा
१. देहूत संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण
२. मंदिराच्या लोकार्पणांनंतर संबोधन
३. विठ्ठल – रुक्मिणी मातेचे दर्शन
४. ध्वज पूजन, राम मंदिर दर्शन
५. शिळा मंदिर, मूर्तीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण
६. भजनी मंडळात पालखी आणि गाथा दर्शन
७. २ वाजता मुख्य मंदिरातुन सभा मंडपाकडे वाटचाल
८. २ वाजून ५ मिनिटांनी सभा मंडपात आगमन
९. ३ वाजून ३० मिनिटांनी रवाना होणार
१०. ४ वाजून ४५ मिनिटांनी राजभवनातील कार्यक्रमासाठी उपस्थिती
११. राजभवनात क्रांतिकारी गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.