प्रवीण राऊत ईडीकडून अटकेत

प्रवीण राऊत ईडीकडून अटकेत

सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे अनके राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटींच्या घोटाळ्यात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी ईडीने कारवाई करत प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ जमिन घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीदेखली प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये दिले असल्याचे पुरावे ईडीला मिळाले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांना ईडीन समन्स बजावले होते. मात्र, हे पैसे कर्ज म्हणून घेतले असल्याचे वर्षा राऊत यांनी सांगितले होते. याप्रकरणी ईडी चौकशी करत असून प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version