देशातील पाच रांज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली. तर गोव्यातही भाजपाने झेंडा फडकवला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांनीसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. गोव्यातील श्यामप्रसाद मुखर्जी क्रीडासंकुलात या शपथविधी ग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवि नाईक, रोहन खंवटे, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल या आमदारांनाही मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे.
प्रमोद सावंत आणि आठ आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
गोव्यात भाजपाने ४० पैकी २० जागांवर भाजपाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.