मराठी मनोरंजन क्षेत्रात प्राजक्ता माळी ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र आता ती आता एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक उद्योजिका म्हणून नावारूपास आली आहे. तिनं सुरू केलेला 'प्राजक्तराज' हा दागिन्यांचा ब्रँड गेल्या दोन वर्षात चांगलाच चर्चेत होता. पण आता या ब्रँडसंदर्भात तिनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता काही कारणांमुळं प्राजक्ता आणि तिच्या टीमकडून या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एक व्हिडिओ शेअर करत तिनं हा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला. खरं तर आजचं लाइव्ह अतिशय स्पेशल कारणासाठी आहे. अर्थात हे माझ्या आणि आपल्या ब्रँडसंदर्भात आहे. आता नव्या आर्थिक वर्षात म्हणजे 31 मार्च पासून माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे 'प्राजक्तसाज – Reviving Maharashtra's Legacy'.
पुढे ती म्हणाली की, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तीन-सव्वातीन वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरू केला तेव्हा मला बिझनेसबद्दल फार काहीच कल्पना नव्हती. बिझनेस इतका मोठा होईल याचीही कल्पना नव्हती. महाराष्ट्रासोबतच देशभरात, परदेशातही मोठा प्रतिसाद मिळतोय. पण अनेकदा शिपिंगदरम्यान खूप अडथळे यायचे. या सगळ्यातून एक मार्ग काढण्यासाठी ' प्राजक्तसाज -Reviving Maharashtra's Legacy' हे नाव जन्माला आलेलं आहे, असं प्राजक्ता म्हणाली.
तसेच पुढे ती म्हणाली की, "आम्हाला लोगोही बदलायचा होता, पण इतका छान, सुंदर लोगो आम्हाला सापडला नाही. त्यामुळे नाव बदललं असलं तरी, लोगो तोच राहणार आहे. तसंच माझं हस्ताक्षरही तेच राहणार आहे", असंही ती म्हणाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.