उस्मानाबादेत सोमय्यांचे चित्रफलक

उस्मानाबादेत सोमय्यांचे चित्रफलक

आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे उस्मानाबादेत सोमय्या यांच्या विरोधात चित्रफलक लावण्यात आले आहेत. फरार मोस्ट वॉन्टेड म्हणून सोमय्यांविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. तसेच सोमय्यांना शोधणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

विक्रांत निधी घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून मोस्ट वॉन्टेड फरार आरोपी भाजपा खासदार किरीट सोमय्या असा उल्लेख या पोस्टवर करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपी किरीट सोमय्या यांना शोधुन आणेल त्याला बक्षीस दिले जाईल, असेही या पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, विशेष न्यायालयाने सोमय्या पित्रा-पुत्रांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अद्याप अटकेची टांगती तलावार आहे. त्यामुळे, आज सोमय्या पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला असून यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version