PM Narendra Modi New Video: जंतर-मंतरवर आक्षेपार्ह भाषा,शिवीगाळ; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले, ‘शिक्षा करुन…’

शिक्षा नव्हे, तर योग्य दिशा देणे हीच समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
PM Narendra Modi New Video: जंतर-मंतरवर आक्षेपार्ह भाषा,शिवीगाळ; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले,  ‘शिक्षा करुन…’

देशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून एक भावनिक संदेश दिला आहे. रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर-मंतरवरील घटनेचा उल्लेख करत, आपल्याविरोधात आणि आपल्या दिवंगत आईविरोधात अपशब्द वापरणाऱ्या तरुणांबाबत कठोर भूमिका न घेता त्यांना माफ करण्याची भूमिका मांडली. शिक्षा नव्हे, तर योग्य दिशा देणे हीच समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जंतर-मंतरवरील घटनेचा उल्लेख

व्हिडिओच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी म्हणाले, “हाय फ्रेंड्स, आज मनातलं काही तुमच्याशी शेअर करावंसं वाटतंय. जंतर-मंतरवर घडलेली घटना संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिली. काही तरुणांनी माझ्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. इतकेच नव्हे, तर माझ्या दिवंगत आईचाही अपमान करण्यात आला. अशा प्रकारची भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही.”

‘लहानपणी चुका होतात’

या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त करण्याऐवजी संयमाची भूमिका घेतली. “लहान वयात चुका होतात. त्या वयात माणसाला स्वतःला सुधारण्याची संधीही मिळते. त्यामुळे अशा चुका झाल्या म्हणून कायमचा शिक्का मारण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग दाखवणे आवश्यक आहे,” असे मोदी म्हणाले.

समाजाने पुढाकार घेण्याची गरज

समाजातील नाराजी आणि वेदना आपल्याला समजतात, असे सांगताना मोदी म्हणाले, “आपल्या मुली अशा प्रकारची भाषा वापरतात, हा आपल्या संस्कृतीसाठी धक्का आहे. पण त्यांना दूर लोटण्यापेक्षा जवळ घेऊन समजावून सांगण्याची वेळ आली आहे. भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा देणे ही समाजाची जबाबदारी आहे.”

शिक्षा नव्हे, संधी द्यावी

तरुणांवर कठोर कारवाई करून किंवा त्यांना न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावून प्रश्न सुटणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. “त्यांना शिक्षा करून परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. मला त्यांना माफ करायचे आहे. समाजानेही माझी ही भावना समजून घ्यावी,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दात-जीभेचे उदाहरण देत मांडला विचार

आपली भूमिका स्पष्ट करताना मोदींनी एक उदाहरण दिले. “कधी कधी दातांमध्ये जीभ चावली जाते आणि रक्तही येते. पण म्हणून आपण दात तोडत नाही, कारण दातही आपलेच असतात आणि जीभही आपलीच असते. त्याचप्रमाणे ही मुलंही आपलीच आहेत. त्यांना दूर करण्यापेक्षा त्यांना योग्य मार्ग दाखवणे महत्त्वाचे आहे.”

तरुणांना दिले सकारात्मक आवाहन

व्हिडिओच्या शेवटी नरेंद्र मोदी यांनी तरुणांना देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचे आवाहन केले. “आपण सर्वांनी एकत्र पुढे जाऊया. नव्या गोष्टी शिकूया, आपल्या चुका ओळखून त्यातून धडा घेऊया. देश वेगाने प्रगती करत आहे आणि तुम्हीही त्या प्रवासाचा भाग व्हावा, हीच माझी इच्छा आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीच मी काम करत आहे,” असे ते म्हणाले.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version