पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी युएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ झायेद ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींनी भारत आणि युएई दरम्यान द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण म्हणून हा पुरस्कार प्रदान केला आहे. यापूर्वी अनेक विदेशी नेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमार पुतिन, राणी एलिझाबेथ आणि चिनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांचा समावेश आहे.
अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी एप्रिल महिन्यात भारताबरोबर असलेल्या संबंधाबद्दल ट्विट केले होते.
भारतबरोबर आमचे ऐतिहासिक संबंध असून या मजबूत संबंधाचे श्रेय माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशामधील संबंधाना मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
भारत आणि युएई मध्ये 60 बिलियन डॉलरचा व्यवसाय होत असल्याचे समजते आहे.
त्याचबरोबर युएई भारताचा तिसरा ट्रेड पार्टनर आहे.
5 ट्रिलियन डॉलर इकॉनोमीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी युएई भारताची मदत करत असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.
Humbled to be conferred the ‘Order of Zayed’ a short while ago. More than an individual, this award is for India’s cultural ethos and is dedicated to 130 crore Indians. I thank the UAE Government for this honour. pic.twitter.com/PWqIEnU1La — Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.