PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे? तर ‘या’ अटींची पूर्तता नक्की करा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे!  पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे? तर ‘या’ अटींची पूर्तता नक्की करा

देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्यता मिळते. 22वा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर आता शेतकरी 23व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र काही तांत्रिक व कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता असल्याने वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरत आहे.  

समोर आलेल्या माहितीनुसार, 23 वा हप्ता जुलै 2026 रोजी जमा होणार असल्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. 

कोणत्या गोष्टींची पूर्तता आवश्यक: 
भू-पडताळणी – शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती व सरकारी नोंदींची पडताळणी पूर्ण झालेली असावी.

ई-केवायसी – आधार कार्डच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

आधार-बँक लिंक – बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

जर सर्व अटी पूर्ण असूनही हप्ता खात्यात जमा झाला नसेल, तर शेतकरी सरकारच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6  या वेळेत 155261 किंवा 011-24300606  या क्रमांकांवर संपर्क केल्यास मदत उपलब्ध होईल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version