‘भाजपाला जनतेचा आशिर्वाद’ – योगी आदित्यनाथ

‘भाजपाला जनतेचा आशिर्वाद’ – योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजप बहुमताने सत्तेवर आला आहे. तर पंजाबमध्ये आप पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेस पक्षांशिवाय देशाचे राजकारण चालू शकते, असे या विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या दणदणीत विजयामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जल्लोष साजरा केला आहे. मुख्यमंत्री योगींकडून जय श्री रामचा नारा करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपाला जनतेचा आशिर्वाद असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या सुशासनामुळे भाजपाचा विजय झाला असल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले. दरम्यान त्यांनी विरोधकांवर खडसून टीका केली आहे. विरोधकांनी खोटा प्रचार केला असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ का जिंकले?

भाजपचे विकास आणि हिंदुत्वाचे आक्रमक राजकारण.

सुशासन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात यश.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचा फायदा.

मायावतींचा छुपा पाठिंबा.

भाजपाची संघटनात्मक बांधणी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version