‘औरंगाबाद नामांतराला पवारांचा विरोध नव्हता’

‘औरंगाबाद नामांतराला पवारांचा विरोध नव्हता’

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापुर्वी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असा नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाने मंजुर केल्याने साहादिकच त्याच आघाडीतील सर्व पक्षांची संमती असल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यासंबंधी भमिका अद्याप त्याबाबत जाहीरपणे स्पष्ट केली नव्हती. पण आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद येथे वेगळी प्रतिक्रिया दिल्यानंतर या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले, शरद पवारांनी इतकेच म्हटले आहे की आमच्या सोबत संवाध साधला नाही. त्यांनी निर्णयाला विरोध केलेला नाही. मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन्ही पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते आणि हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. औरंगाबादच्या नामांतरावर शरद पवार म्हणाले की नावे बदलुन काही होत नाही. त्याचा काही उपयोग नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मंत्रिमंडळाचा आहे, असा मानण्याचा प्रघात आहे, असे म्हणत शरद पवारांनी शहरांच्या नामांतरावर आपली भूमिका मांडली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version