‘या’ दिवशी होणार परिणीतीचा साखरपुडा

‘या’ दिवशी होणार परिणीतीचा साखरपुडा

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी :अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. अनेकवेळा दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्याही आल्या. मात्र त्या तारखा चुकीच्या ठरल्या. परिणीती आणि राघव या महिन्यात साखरपुडा करणार आहेत.अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा १३ मे रोजी नवी दिल्लीत लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. या बातमीने परिणीतीचे चाहते खूप उत्साहित झाले. मात्र, परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून या बातम्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.अनेकदा सोशल मीडियावर त्या दोघांचेही एकत्र फोटो व्हायरल झाले होते.

गेल्या महिन्यात परिणीती आणि राघवचा रोका समारंभ पार पडला असून ते यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी देखील अनेकदा चर्चा झाली.परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले. यानंतर अभिनेत्री सतत दिल्लीचा दौरा करत होती. दोघेही अनेकदा विमानतळावर स्पॉट झाले होते. एकदा तर दोघांनी एकमेकांचे हातात हात घेतलेला देखील दिसला. पण त्यांच्या नात्याबद्दल दोघेही कधीच उघडपणे बोलले नाहीत.परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, परिणीती अखेरची उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत अखेरची दिसली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version