परशुराम घाट ९ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

परशुराम घाट ९ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झालेला होता. ५ जुलैला मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येवून पूर्णपणे वाहतूक बंद झाली आहे.अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून ९ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील दरड खाली कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या आधी ०२ जुलै २०२२ रोजी परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद झाला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड बाजूला करुन पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली होती. त्यानंतर दरड खाली येण्याचे प्रमाण वाढतचं राहिले. त्यामुळे ५ जुलै रोजी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी कधीही खाली येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version